Breaking News

भगवे वादळ युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी तांबे व उपाध्यक्षपदी वाघमारे


सोनई ( प्रतिनिधी) - येथील भगवे वादळ युवा प्रतिष्ठान सोनईच्या अध्यक्षपदी सोमानथ तांबे व उपाध्यक्षपदी महेश वाघमारे यांची निवड करण्यात आली. गेली अनेक वर्षांपासून सोनई परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात हे प्रतिष्ठान अग्रेसर आहे. गणपती नवरात्र या सणानिमित्त सामाजिक सांस्कृतीक उपक्रम हे प्रतिष्ठान राबवते. तसेच दर संक÷ष्टी चतुर्थीला गणपतीची गावातील विविध प्रतिष्ठित नागरिकांकडून आरती महाप्रसाद याचे आयोजन करण्यात येते. गरीब मुलांना गणवेश वाटप नेत्रतपासणी व रक्तदान शिबीर घेतले जाते अशी माहिती मंडळाचे मार्गदर्शक अमोल चव्हाण यांनी दिली. या निवडीच्या वेळी प्रतिष्टानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.