Breaking News

‘कारवाडी’च्या उपसरपंचपदी कोकाटे


कोपरगाव शहर प्रतिनिधी : 

तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील कारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे दिगंबर कोकाटे यांची नुकतीच निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुराशे यांनी काम पाहिले. यापूर्वीच थेट जनतेतून कोल्हे गटाच्या श्रीमती पल्लवी माळी या सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत.

या निवडणुकीत कोल्हे गटाच्या सरपंचासह सहा सदस्य विजयी झाले आहेत. या सर्वांचे आ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी अभिनंदन केले. नवनिर्वाचित सरपंच पल्लवी माळी आणि उपसरपंच दिगंबर कोकाटे यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. याप्रसंगी दिलीप बनकर, रघुनाथ फटांगरे, सुनिल घुमरे, दत्तात्रय भोसले, रामकृष्ण कोकाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दिलीप बनकर यांनी आभार मानले.