Breaking News

इराणच्या कबड्डी सुवर्णयशामध्ये महाराष्ट्रीयन हात


नवी दिल्ली वृत्तसंस्था

१९९० साली एशियाड स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळपासून आतापर्यंत भारताने कबड्डीत आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. मात्र इंडोनेशियात सुरुअसलेल्या १८ व्या एशियाड स्पर्धांमध्ये भारताच्या गडाला इराणने भारताच्या पुरुष संघाना उपांत्य सामन्यात पराभवाचा धक्का दिला, तर महिला संघाला अंतिम फेरीत इराणच्यामहिलांकडून हार पत्करावी लागली. इराणच्या या सुवर्णाध्यायात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. या विजयाच्या शिल्पकार ठरल्या आहेत त्यांच्या महाराष्ट्रीयन प्रशिक्षिका शैलजाजैन. शैलजा या महाराष्ट्रातल्या नाशिकला राहणाऱ्या आहेत. आतापर्यंत त्यांनी घडवलेल्या बऱ्याच खेळाडूंना पुरस्कारही मिळाले आहे. इराणने 2008 साली शैलजा यांच्याशी संपर्कसाधला होता. पण त्यावेळी शैलजा या नोकरी करत होत्या. शैलजा निवृत्त झाल्या आणि इराणने पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मात्र शैलजा यांनी इराणला जायचेठरवले.इराणमध्ये गेल्यावर आहार ते वेशभूषा या साऱ्या गोष्टींमध्ये त्यांच्या आयुष्यात फरक पडला. पण यावेळी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य इराणने दिले होते. संघ निवडीपासून तेकोणत्या खेळाडूला कधी खेळवायचं, हे सारे निर्णय शैलजा घेत होत्या. त्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे इराणने सुवर्णपदक जिंकले, असे शैलजा सांगत होत्या.