गणेशमुर्ती, राख्या करमुक्त मोदी सरकारकडून रक्षाबंधनचे गिफ्ट

नवी दिल्ली : रक्षाबंधन, गणेश चतुर्थी या सणासुदीच्या काळात मूर्ती, राखींसह इतर वस्तूंवरील जीएसटीतून सूट देण्यात आली आहे. या संबंधिची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी केली. रक्षाबंधन येत आहे. त्याच पाठोपाठ गणेश चतुर्थीसह गौरी पूजन सुध्दा येत आहे. एकुणच सणासुदीच्या या दिवसांत सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारचे पुतळे, हस्तकलेच्या वस्तू, हातमाग, राखीसह इतर वस्तूंना जीएसटीतून सूट देण्यात आली आहे, अशी घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.

हा आपला वारसा आहे. तो आपण जपून ठेवायला हवा, असेही गोयल यावेळी म्हटले. ‘येणार्‍या रक्षाबंधनला राखीला जीएसटीमधून वगळले आहे. म्हणजे आता राखीवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाही. त्याबरोबरच गणेश मुर्तीलाही जीएसटीमधून वगळले आहे.’ याशिवाय हस्तशिल्प आणि हँडलूमलाही जीएसटीमधून वगळण्यात आले आहे.’ असे प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्थमंत्री पियूष गोयल म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकार जीएसटीचा टॅक्स स्लॅब 14 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे केंद्र सरकार 28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत असताना दुसरीकडे 12 आणि 18 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करुन एकच 14 टक्क्यांचा स्लॅब करण्याचा विचार सरकार करत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget