मागण्या मान्य केल्याने सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे


कर्जत / प्रतिनिधी 

सकल मराठा समाजाच्यावतीने मागील 22 दिवसापासून कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासनाने मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ भाग असून ते वगळता मराठा समाजाच्या आदी न्यायिक मागण्या मान्य केल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची माहिती समन्वयक नानासाहेब धांडे यांनी दिली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे यांनी जिल्हाधिकारी यांचे पत्र आंदोलकाना सपुर्द केले.

मराठा समाजास तात्काळ आरक्षण मिळावे, यासह आदी न्यायिक मागण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन 22 दिवसापासून शांततेत सुरू होते. यावेळी वेळोवेळी आंदोलकानी कर्जत प्रशासनाला निवेदन दिले होते. कर्जत प्रशासनाने ही आंदोलकांचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पुढील कारवाईसाठी तात्काळ पुढे केले होते. या सर्व निवेदनाची सरकार आणि जिल्हा-प्रशासनाने सकरात्मक दखल घेत सोमवारी कर्जतच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार किरण सावंत यांच्यामार्फ़त आंदोलकांना मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने ते वगळता इतर न्यायिक मागण्या मान्य केल्याचे पत्र आंदोलकांना देण्यात आले. सदर पत्रामध्ये मराठा आरक्षणाची वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल, वेळ पडल्यास सरकार विशेष अधिवेशन बोलावून कार्यवाही करणार असल्याचे घोषित केले आहे. यासह मराठा आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरतीस स्थगिती देण्यात आली आहे. विविध आंदोलनात जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यात येतील. मात्र पोलिसावर हल्ला किंवा तोड़फोड़ अथवा मारहाणीचे थेट पुरावे अथवा व्हिडिओ क्लिप असतील ते वगळूंन, तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना असेल, किंवा छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना असेल अथवा होस्टेल किंवा इतर योजना असतील यामधील अडचणी दूर करून, त्याची प्रभावी अमलबजावणी करण्याची उपाय योजना करण्यात येईल. या मागण्या मान्य करत असल्याचे पत्र देण्यात आले असून, आंदोलकांनी सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात यावे, अशी विनंती केली होती. त्याअनुषंगाने कर्जत सकल मराठा समाजाने प्रशासनाच्या विनतीस मान देत गेल्या. 22 दिवसापासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा समन्वयक नानासाहेब धांडे यांनी केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget