दलित महासंघाच्या बैठकीत पदाधिकार्‍यांची निवड


सुपा / प्रतिनिधी
दलित महासंघाची तालुक्याची बैठक पारनेर येथे नुकतीच पार पडली. ही बैठक दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते नामदेव चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितित व जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी सुलाखे यांनी कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये आलेली मरगळ दूर करुन संघटनवाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने सहभाग घेवून समाजकार्य करून पारनेर तालुक्यात संघटनेचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.
यावेळी दलित महासंघाच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यामध्ये पारनेर तालुकाध्यक्षपदी अंकुश राक्षे यांची तर, उपाध्यक्षपदी पंढरीनाथ साळवे आणि कार्याध्यक्षपदी प्रविण औचिते यांची निवड सुलाखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली.
यावेळी दि.16 ऑगस्ट रोजी निघणार्‍या मातंग क्रांती मोर्चाचे नियोजन करण्यात आले. आपल्या हितासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी वाडिया पार्क येथे सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दलित महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास साळवे, रोहिदास साळवे, शंकर सूर्यवंशी, ज्ञानदेव साठे, दगड़ू पेटारे, बाळासाहेब उमाप, पांडुरंग अवचिते, सुखदेव राक्षे, ताराचंद गुढेकर, पोपट उमाप, मारुति उमाप, संजय उमाप, रामदास उमाप, बाळासाहेब भालेकर, योगेश रोकडे, सतिश उमाप, अनिल शेंडगे, बाळासाहेब साळवे, राजेंद्र आल्हाट, दत्तात्रय गायकवाड, एकनाथ औचिते, बाळू औचिते, नारायण शेंडगे, मधुकर पठारे, प्रशांत औचिते, अंकुश राक्षे, शंकर सुर्यवंशी, ज्ञानदेव साठे यांच्यासह दलित महासंघाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget