Breaking News

रक्तदान शिबिराचे आयोजन


सोनई ( प्रतिनिधी ) - सदगुरु माता सुदिक्षजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा सोनईच्या वतीने लक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय, घोडेगाव रोड येथे रविवार दि.26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प.पु. हरिशजी महाराज व प.आ. विठ्ठलजी खाडे महाराज यांनी दिली.

या शिबिराचे उदघाटन मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, अशोक साळवे, शिवा बाफना, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कसबे, स.पो.नि.कैलास देशमाने, नागेबाबा मल्टिस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे विश्‍वनाथ ढाले, विनायक दरंदले, विजय खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी भक्त मंडळाकडून करण्यात आले आहे.