Breaking News

शीख दंगलीत काँग्रेसचा सहभाग नव्हता; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा दावा


लंडन/वृत्तसंस्था : 1984 च्या शीख विरोधी दंगली फार दु:खद घटना होती. त्या दंगलीमध्ये 3,000 शीख मारले गेले होते. त्यावेळी राजधानी दिल्लीमध्ये केंद्राची सत्ता काँग्रेसकेडच होती. मात्र त्या दंगलीत काँग्रेसचा सहभाग नसल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी सध्या विदेश दौर्‍यावर आहेत. युनाइटेड किंगडमच्या संसदेत झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांना 1984 च्या दंगलीसंबंध विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले, माझ्या मनात कोणताही गोंधळ नाही. ही एक दु: खद घटना आहे, हा एक दु: खद अनुभव होता. तुम्ही म्हणता की, काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी होता, पण मी तुमच्या या मताशी सहमत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याबरोबरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज्य यांच्यावर टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयावर पंतप्रधान कार्यालयाची मक्तेदारी असून, या खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यांनी काहीच काम केले नसून, फक्त लोकांचे व्हिसा बनवण्याचे काम केले असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. लंडन येथे झालेल्या इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज (आयआयएसएस) च्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून जास्त वेळ लोकांचे व्हिझा देण्यातच खर्च केला आहे. अशी टिकी राहूल गांधींनी आहे. सुषमा स्वराज या कणखर नेत्या आहेत, त्यांना काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. त्यांना खरोखरच कोणते अधिकार द्यायचे असतील तर, त्यांनी ही मक्तेदारी तोडायला पाहिजे अशी टिका राहूल गांधी यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता केली आहे.

चिनी सैन्य अद्यापही डोकलाममध्येच

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. डोकलाममध्ये अजूनही चिनी सैन्य असल्याचा दावा करत मोदींना विदेशातून लक्ष केले. ते लंडनच्या इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ स्ट्रेटिक स्टडीजमध्ये बोलत होते. मोदी सरकार आकड्यांचे बाजीगार असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मोदींच्या व्यक्तव्याचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, मोदी सांगतात, की चीनने सैन्य हटवले आहे’. पण अद्याप ही चीनची सेना डोकलाममध्येच आहे. तसेच माझ्याकडे डोकलामचे तपशील नाहीत. परंतु मी म्हणू शकतो की, डोकलाम ही गंभीर समस्या असून हा मुद्दा केवळ सीमावादचा नसून अतिशय संवेदनशील असल्याचेही राहुल यांनी सांगितले.