निमगाव वाघा येथे संत सावता महाराजांची पुण्यतिथी साजरी


अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील सावता महाराजांच्या मंदिरासमोर आयोजित करण्यात आलेल्या किर्तनात समस्त ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले.
ह.भ.प. अमोल महाराज जाधव यांनी किर्तनातून आजची समाज व्यवस्था व समाजाच्या उध्दारासाठी सावता महाराजांच्या विचारांची गरज स्पष्ट केली. भरकटत चाललेल्या युवा पिढीला भक्ती मार्ग वाचवू शकतो. तर आई वडिलांच्या सेवेतच खरा परमार्थ असल्याचे सांगत सावता महाराजांच्या विचारांशी समरुप खरा भक्ती मार्ग त्यांनी उलगडून दाखविला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी नगर जिल्हा अ.भा. वारकरी मंडळाचे संपर्क प्रमुख पै.नाना डोंगरे, जयराम जाधव, लक्ष्मण चौरे, बन्सी जाधव, भाऊसाहेब आनंदकर, भागचंद जाधव, भास्कर उधार, भाऊसाहेब कापसे, बबन जाधव, तुकाराम खळदकर, शिवाजी उधार, चंद्रकांत जाधव, विठ्ठल फलके, नवनाथ हारदे, सुरेश जाधव, अंबादास जाधव, भाऊसाहेब ठाणगे, नवाब शेख, मारुती जाधव, पोपट भगत, दत्तात्रय फलके, दिगंबर जाधव, गोरख गायकवाड, विजय जाधव आदींसह ग्रामस्थ, महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget