युवक मंडळाच्या वतीने डॉ. अरुण पवार यांचा सन्मान


दहिगावने / प्रतिनिधी - येथीलवैद्यकीय व्यावसायिक व माजी सरपंच डॉ. अरुण सावळेहरी पवार यांना नुकताच पुणे येथील लायन्स क्लब या सामाजिक संस्थेचा या वर्षीचा समाजसेवक हा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील धर्मवीर युवा प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ व छत्रपती शंभुराजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे
अध्यक्ष व दहिगावने येथील साई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण पवार यांचा सत्कार करण्यात आला.
लायन्स क्लब या सामाजिक संस्थेकडून दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना समाजसेवक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. डॉ. अरुण पवार यांनी आपल्या बागायती शेतीवर आधुनिक पद्धतीच्या उपाययोजना करून विक्रमी शेती उत्पादने घेतली असून परिसरात एक आदर्श शेतकरी म्हणून परीचीत आहे. तर वैद्यकीय सेवा देत असताना डॉक्टर सेल संघटनेच्या माध्यमातून तालुका व जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. धर्मवीर युवा प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ व छत्रपती शंभुराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने समाजसेवक पुरस्काराने सन्मानित डॉ अरूण पवार यांना दहिगाव-ने गावाचा नावलौकिक वाढवल्याने त्यांना गौरविण्यात आले. यावेळी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जाधव भाऊ, पिनु बोरुडे, सचिन पारख, संजय पाठे, बबन शिंदे, मनोज गर्जे, गौरव काशिद, साई जाधव, कुमार मरकड, अमोल जाधव, सागर मरकड, गर्जे ऋषीकेश, बाळासाहेब शिंदे, संदिप संकुडे, राहुल परदेशी, अमोल मतकर, बबन शिंदे, नवनाथ वारुळे, अशोक सातदिवे, अंबादास गर्जे आदी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय घुले यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget