Breaking News

'ती' स्फोटकं घातपातासाठीच होती - जितेंद्र आव्हाड


मुंबई : सनातनचा साधक वैभव राऊत आणि त्याच्या दोन साथीदारांकडून एटीएसने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता असा आरोपही आव्हाड यांनी केलाय. आव्हाड यांची टि्वट करून हा आरोप केलाय.

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचं तीव्र आंदोलन सुरू आहे. ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांचा उद्रेक झालाय. आता यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्यांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलीये. नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी गावटी बाॅम्ब आणि स्फोटक सापडली होती. ही स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठीच होती असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.