पाथर्डी येथे ट्रेनिंग ऑफ ट्रेनर प्रशिक्षणाचे आयोजन


पाथर्डी -(प्रतिनिधी)- भारत सरकारच्या ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल व स्वस्तिक महिला मंडळ, पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यामानाने पाथर्डी येथे ट्रेनिंग ऑफ ट्रेनर या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतातून महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, ओडिसा, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांमधून प्रशिक्षणार्थी आलेले असून 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत प्रशिक्षण कालावधी आहे. तसेच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी दिल्ली येथून शिप्रा चतुर्वेदी व मास्टर ट्रेनर आलेले आहेत, अशी माहिती स्वस्तिक महिला मंडळाच्या अध्यक्षा सपना काटे यांनी दिली. पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत सुरू असलेल्या ट्रेनिंग सेंटर मध्ये ब्युटी सेक्टरच्या कोर्ससाठी विद्यार्थाना प्रशिक्षण देण्याकरिता ट्रेनर ला ढेढ कोर्स करणे अनिवार्य आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये 2018-2019 मधील पहिले ट्रेनिंग पाथर्डी येथे आयोजित केले आहे. यावेळी बोलताना शिप्रा चतुर्वेदी यांनी म्हटले की, या सेक्टर मध्ये आम्ही गेल्या चार वर्षांपासून काम करत आहोत. सुरवातीला यामधील कुठलेही ज्ञान नव्हते, या सेक्टरच्या माध्यमातून शिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जातो. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी आत्मविश्‍वास दिला जातो.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget