कष्टाच्या पैश्यातून विद्यार्थ्यांनी जमवला केरळ पुरग्रस्तांसाठी निधी.;राख्या बनवून केली घरोघर विक्री


अहमदनगर (प्रतिनिधी)- केरळच्या जलप्रलयाने जनजीवन विस्कळीत झाले असताना शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. लाखो लोक बेघर झाले आहेत. देशभरातून मदतीची ओघ सुरु असताना, रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मी भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांची घरोघरी विक्री करुन केरळ पुरग्रस्तांसाठी निधी गोळा केला आहे. विद्यार्थ्यांनी राखी विक्रीतून 5 हजार 300 रुपये जमा करुन, कमविलेल्या कष्टाच्या पैश्यातून पुरग्रस्तांच्या निधीत खारीचा वाटा उचलला आहे. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शाळेत सात दिवस कार्यशाळेच्या माध्यमातून इ.1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीने विविध आकर्षक राख्या बनवून त्याची घरोघरी विक्री केली. आज शाळेत झालेल्या रक्षा बंधनाच्या कार्यक्रमात सदर जमा झालेली रक्कम मुख्यध्यापकांकडे सोपविण्यात आली. ही रक्कम केरळच्या पुरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. रक्षा बंधन आपल्याला संरक्षण व मदत करण्याचा संदेश देत असते. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व मदतीची भावना निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक अरविंद काकडे उपस्थित होते. काकडे म्हणाले की, मदत किती रुपयाची केली. यापेक्षा त्यामागची भावना महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. शाळा ही फक्त ज्ञानापुरती मर्यादीत नसून या ज्ञानमंदिरात सुजान नागरिक घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर उपक्रम मुख्यध्यापक शिवाजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख सुजाता दोमल, उर्मिला साळुंके, मिनाक्षी खोडदे, अजय गुंड, शितल रोहोकले, बाबासाहेब शिंदे, इंदूमती दरेकर या शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget