कुकडी प्रकल्पातील आवर्तन सोडण्यासाठी ठिय्या


कर्जत / प्रतिनिधी
कुकडी प्रकल्पातील बाराशे एमसीएफटी हक्काचे पाणी सीना धरणात सोडून, सीना धरणातून आवर्तन सोडण्यासाठी आज श्रीगोंदा याठिकाणी कार्यकारी अभियंता कुकडी प्रकल्प यांच्या कार्यालयांमध्ये कामबंद ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत भोसा खिंडीतून सीना धरणात व सीना धरणातून आवर्तन सोडणार नाही. तोपर्यंत आंदोलक उठणार नाही, अशा प्रकारचा निर्धार आंदोलकांनी केला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, मिलिंद बागल, प्रकाश कदम, मनोज खेडकर, श्रीमंत कदम, सुधीर फरताडे, अरुण शेटे, भाऊसाहेब जगदाळे, बंडू जगदाळे, दादा गायकवाड भारत काकडे, विनोद कदम, दत्तात्रय डूबल, प्रविण खेडकर, भास्कर जगदाळे, ज्योतीराम पन्हाळकर, किशोर कदम, बाबुराव खेडकर, गोकुळ वीरकर, सुरेश नवसरे, कांतीलाल लाड, शत्रुघ्न लाड, अण्णासाहेब जाधव, नवनाथ डुकरे, श्यामराव महानवर, बापूराव मेंगडे, बाळासाहेब गरडलाड कल्याण शेवाळे, विठ्ठल नवसरे, जालिंदर नवसरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget