सिंधुदुर्ग जिल्ह्यात दक्षिण आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारणार - राज्यमंत्री दीपक केसरकर



मुंबई : भारत आणि माल्टा देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पाऊल टाकले असून माल्टा देशाच्या सहकार्याने डिसेंबरमध्ये माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठे डाटा सेंटर सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. माल्टा देशाचे पर्यटनमंत्री कोनरॅड मिझ्झी आणि पंतप्रधान कार्यालयातील सचिव तानिया ब्राऊन आदी यावेळी उपस्थित होते.

माल्टा देशाचे पर्यटनमंत्री श्री. मिझ्झी आणि माल्टाच्या पंतप्रधान कार्यालयातील सचिव तनिया ब्राऊन यांचे शिष्टमंडळाने आज सिंधुदुर्गचे पालक मंत्री श्री. केसरकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत सिंधुदुर्गमधील पर्यटन वाढीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget