नेवासा येथील हजयात्रेला जाणार्‍या कुटुंबियांना सर्वधर्मीयांच्या वतीने निरोप


नेवासा(प्रतिनिधी) - नेवासा येथील सर्वसामान्य कुटुंबातील युवक जमशिदखान पठाण यांच्यासह घरातील दोन महिला हजयात्रेला रवाना झाल्या. त्यांना मुस्लिम समाज बांधवांसह इतर धर्मीय नागरिकांनी सत्कार करून निरोप दिला.
नेवासा येथील बाराभाई मस्जिदमध्ये हजयात्रेला जाण्याअगोदर नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मौलाना युनूसभाई पटेल यांनी प्रार्थनेद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी अलअमीन उर्दू हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हापरिषद सदस्य महंमदभाई आतार, अँड.एम.आय.पठाण, आयुबभाई जहागीरदार यांनी हार घालून मक्का मदिना हजयात्रेसाठी गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. हजयात्रेला जाणार्‍या जमशीदखान पठाण यांच्या समवेत बीबीखान पठाण, तायराबीबी पठाण यांचा समावेश आहे.
यावेळी हजयात्रेकरू जमशिदखान पठाण यांना निरोप देण्यासाठी अकबरखान पठाण, रमहूभाई पठाण, अँड.जावेद इनामदार, रहेमानभाई पिंजारी, हाजी ईन्नूसभाई , नाईकवाडे, शफीकभाई जटाली, शरीफभाई शेख, अजमत पठाण, जलाल पठाण,नदीम पठाण, शाहिद पठाण, अकबर आतार, इरफान आतार यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget