देशात एकत्रित निवडणुका नाहीच; मुख्य निवडणूक आयुक्तांची स्पष्टोक्ती



औरंगाबाद /प्रतिनिधी

येत्या वर्षात (2019) होऊ घातलेल्या लोकसभा व काही राज्यातील विधानसभेच्या निवडणूका एकत्र घेण्यात येणार नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांनी गुरुवारी दि. 23 शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात संपादकांशी चर्चा करतांना स्पष्ट केले आहे.


देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी कायदेमंडळाने ठरवले पाहिजे. तसेच यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल. तसेच लोकप्रतिनिधी कायद्यामध्येही सुधारणा करावी लागणार आहे. या प्रक्रियेला किमान वर्षभराचा कालावधी लागू शकतो. म्हणूनच आगामी 2019 मध्ये होणारी लोकसभा व 11 राज्यांतील विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची कुठलीही शक्यता नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी जेव्हा राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरु होईल. तेव्हा या बाबी कळण्यास व तयारी करण्यास पुरेसा वेळही निवडणूक विभागाला मिळू शकणार आहे. या परिस्थितीसाठी आम्ही तयार आहोत. लोकसभेसाठी केंद्राचे कर्मचारी आणि विधानसभा निवडणुकांसाठी राज्यांचे कर्मचारी पुरविण्याची विनंती मुख्य निवडणूक आयुक्तांनी राष्ट्रपतींना केल्यास ती पुरविण्याची तरतूद राज्यघटनेत असल्याचे रावत म्हणाले. आम्हाला निमलष्करी दलाचे जवानही बंदोबस्तासाठी मिळतात. पण पूर्वी म्हटल्याप्रमाणे कायदे तयार करणार्‍या मंडळींनी राज्यघटनेत बदल करण्याबाबत पाऊले उचलायला हवीत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget