Breaking News

हजयात्रेला जाणार्‍या कदिरखान पठाण यांना सर्वधर्मीय शुभेच्छा


नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा येथील कदिरखान पठाण हे नेवासा येथून हजयात्रेला रवाना झाले. यावेळी मुस्लिम समाज बांधवांसह इतर धर्मीय बांधवांनी त्यांना यात्रेतील प्रवास सुखकर होण्यासाठी सत्कारद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. 
नेवासा येथे नमाज अदा करून कदिरखान पठाण हे हज यात्रेला निघाले असता त्यांचे जेष्ठ विधीतज्ञ अँड. एम.आय.पठाण, जातीय सलोखा समितीचे सदस्य असिफभाई पठाण, अलअमीन उर्दू हायस्कूलचे संस्थापक महंमदभाई आतार, रम्हूभाई पठाण, मौलाना युनूसभाई, रहेमानभाई पठाण, मोजमखान पठाण, ऊलायतखान पठाण, बाबरखान पठाण, शफीक शेख, महेमुद पटेल, बरकत शेख, रफिक मामू, शरीफभाई शेख, पत्रकार सुधीर चव्हाण, संतोष चांदणे यांनी हजयात्रेला जाणार्‍या कदिरखान पठाण यांचा सत्कार करून गळाभेटीद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.