भाजप सरकारला आश्‍वासनांचा विसर - कॉ. संजय नांगरे


शेवगाव (प्रतिनिधी)- भाजपा सरकारने गेल्या चार वर्षांत एकही आश्‍वासन न पाळता नोटाबंदी व जी. एस. टी. लागु करून सर्वसामान्य जनतेच्या अडचणीत भर घातली. दलित,अल्पसंख्याक व स्ञीयांवरील अत्याचारात या चार वर्षांत मोठया प्रमाणात वाढ झाली. पेट्रोल ,डिझेल, गँस दररोज वाढत असल्यामुळे देशात महागाई वाढली. सत्तेवर येताना अच्छे दिनाच गाजर दाखवणार्‍या भाजप सरकारने अच्छे दिनाचे तीनतेरा नऊबारा वाजवले. असा आरोप भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. संजय नांगरे यांनी केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संविधान बचाव, देश बचाव, भाजपा हटाव ...जनजागरण अभियाननिमित्त आव्हाने व वडुले येथे सभा घेऊन सरकार विरूध्द घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉ. बापुराव राशिनकर , कॉ भगवान गायकवाड, कॉ. गहिनीनाथ आव्हाड,कॉ. अमोल खोसे, कॉ. वैभव शिंदे यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
नांगरे म्हणाले , भाजप सरकारच्या 4 वर्षांच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत गेल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार असा वर्ग या भाजपा सरकारवर नाराज आहे मराठा, धनगर ,मुस्लिम आरक्षणाचे गाजर दाखवत सरकारने जनतेला झुलवत ठेवले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget