Breaking News

मेघराज बजाज यांना आदर्श उद्योजकता पुरस्कार


कुळधरण / प्रतिनिधी । 25
कर्जत तालुक्यातील राशिनचे उद्योजक मेघराज बजाज यांना राष्ट्रीय कार्यक्रम उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात हा कार्यक्रम झाला. पुणे येथील काव्य मित्र संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.
राशीन येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फर्निचर व्यवसाय सुरू करून बजाज यांनी तो नावारूपाला आणला. या उद्योगातून कित्येक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला. त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर तसेच संस्था पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.