संगमनेरात रस्त्यांसाठी २५ कोटी निधी मंजूर


संगमनेर प्रतिनिधी

तालुक्यातील प्रत्येक गावांसह वाडीवस्तीचा दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तालुक्यात सर्वत्र रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे. तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी सुमारे २५ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

या कामांसाठी सर्व जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी आ. थोरात यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. नव्याने होणार्‍या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील दळवळवळणाची सुविधा आणखी वाढणार आहे. या कामांना तातडीने सुरुवात होणार असल्याने सर्व भागात समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget