'स्पर्धा परीक्षांची पुर्व तयारी' एक दिवशीय परिसंवाद


प्रवरानगर : शिक्षण घेताना केलेल्या स्पर्धा परिक्षांच्या तयारीचे महत्व हे स्पर्धा परिकांपुरतेच मर्यादित न राहता यातुन सुखकारक जीवन जगण्यासाठी विपुल माहितीच भांडार उपलब्ध होतं. असे सांगताना पदवी घेतानाच पैशांप्रमाणे वेळेचा हिशोब ठेऊन अतिरिक्त अभ्यास केला तर,कमी कालावधीत स्पर्धा परीक्षामधून नक्कीच यश प्राप्त करता येईल असा विश्वास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी 'स्पर्धा परीक्षांची तयारी' या एक दिवशीय परिसंवादात व्यक्त केला. 

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी आणि कृषी संलग्नित महाविद्यालयांच्या वतीने आयोजित 'स्पर्धा परीक्षांची पुर्व तयारी' या एक दिवशीय परिसंवादाचे उदघाटन डॉ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी. कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले. निशिकांत चव्हाण आणि विक्रीकर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हेमंत जंगले हे माजी विद्यार्थी आणि कृषी संलग्नित महाविद्यालयांचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस , स्किलडेव्हल्पमेंट आणि प्लेसमेंट विभागाचे समन्वयक डॉ धनंजय आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे यांनी स्वागत, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर यांनी ओळख तर कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले. 

पदवी घेतल्यांनंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ग्रामीण भागातील मुला-मुलींची शहरात क्लासेसच्या माध्यमातून होणारी ससेहोलपट. आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी. पदवीचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयीची भीती दूर करून त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून 'स्पर्धा परीक्षांची पुर्व तयारी' या एक दिवशीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. हेमंत जंगले आणि निशिकांत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. डॉ. विशाल केदारी, प्रा. अमोल सावंत,प्रा. भाऊसाहेब घोरपडे, डॉ. निलेश सोनवणे यांनी हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget