Breaking News

पाच टक्के आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नेवासा फाटा येथे रास्तारोको


नेवासा (प्रतिनिधी) - मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नेवासाफाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते इम्रानभाई दारुवाले व अल्ताफ पठाण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सकाळी 11.30 वाजता सर्व मुस्लिम कार्यकर्ते शेवगाव रोडवरील राजमुद्रा चौकात जमा झाले. मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मुस्लिम समाजातील तरुण रस्त्यावर आले. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार रास्तारोको केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली.
यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे इम्रानभाई दारुवाले म्हणाले की आज मुस्लिम समाज उपेक्षित जीवन जगत आहे त्यामुळे समाजाचा उत्कर्ष नाही. आमची मुलं बाळ अधिकारी व्हावेत असे आमचे स्वप्न असल्याने सरकारने अधिक अंत न पाहता मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी करत हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने करत असून आमच्या न्यायहक्का साठी आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन तिव्र करू, प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेऊ असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.
यावेळी अँड.राजुभाई इनामदार, जेष्ठ नेते गफूरभाई बागवान, राजमहंमद शेख, अँड.जमीर शेख, रिपाईचे अशोक गायकवाड, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड.वसंतराव नवले, मराठा महासंघाचे गणेश झगरे, मौलाना जाकिरभाई शेख, मुन्नाभाई शेख, नजीरभाई सय्यद, इरफान शेख, हारूणभाई जहागीरदार, नवीद दारुवाले, युनुस नाईकवाडी, नगरसेवक फारुकभाई आतार,फारुकभाई कुरेशी, फिरोज पटेल, असिर पठाण, एजाज पटेल, अब्बासभाई बागवान, इसाक इनामदार, मुस्तकीम शेख, समीर फिटर, शेखर अहिरे, सोहेल सय्यद, शाहिद पठाण, सलमान आतार, अज्जूभाई पठाण, अमीन शेख, शाहरुख शेख, जिशान दारुवाले यांच्यासह सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.