Breaking News

पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती : कळमकर


सुपा / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पतसंस्थांचे व्यवहार उत्तमप्रकारे सुरू असुन, पतसंस्था, सोसायट्या यांच्या माध्यमातून शेतकरी आपली आर्थिक उन्नती करून घेत असल्याचे प्रतिपादन माजी आ. दादा कळमकर यांनी केले.
पानोली येथील कॉ. बाबासाहेब ठुबे पतसंस्थेच्या पळवे खुर्द शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य आझाद ठुबे, युवक नेते राहुल शिंदे, सैनिक बँकेचे उपाध्यक्ष बबन सालके, युवराज पाटिल, विक्रम कळमकर, गंगाराम कळमकर, संजय तरटे, रामदास तरटे, भाऊसाहेब भोगाडे, नारायणराव गायकवाड, नाना खामकर, किसन कळमकर, तात्यासाहेब देशमुख, आंबादास तरटे, आप्पासाहेब साठे, भिवसेन मुंगसे, अरुण कळमकर, आप्पासाहेब कळमकर, डी. बी करंजुले, संतोष गायकवाड, किरण साठे उपस्थित होते.
कळमकर म्हणाले की, पारनेर तालुक्यात पतसंस्थाचे योगदान मोठे आहे. सहकार चळवळ व सहकारी संस्था पुढे घेऊन जाण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. संस्थेने सर्व सामान्य शेतकरी व व्यवसायिक यांना कर्ज पुरवठा करून आर्थिक आधार दिला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक कॉ. संतोष खोडदे यांनी तर, आभार व्यवस्थापक संजय भगत यांनी मानले.