मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे


चांदा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सहा सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपल्या पदाचे राजिनामे दिले असुन फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन आत्तापर्यंत अनेक मोर्चे काढले, रस्ता रोको आंदोलने झाली, समाजातील अनेकांनी आरक्षणासाठी आपल्या जीवनयात्रा संपविल्या, आमदारांनी राजीनामे दिले, आपल्या तालुक्यातील पंचायत समिनीचे सभापतींनी देखील आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला. आता हे लोन ग्रामपंचायतीपर्यंत येवून पोहोचले आहे. महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायतीच्या चंपाबाई नानासाहेब गायके, लताबाई मारुती केदार, भारती संतोष सांगळे, मिनीनाथ दत्तात्रय गायके, विलास गोविंद पालवे, राधाकिसन नामदेव सानप, विद्यमान सहा सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे ग्रामविकास अधिकारी खाटीक यांचेकडे सुपूर्द केले आहेत. या प्रसंगी खरेदी विक्रीसंघाचे संचालक राजेंद्र गायके, मुळाचे संचालक एकनाथ जगताप, सेवा संस्थेचे अध्यक्ष शरद बोरुडे, मा. उपसरपंच राजेंद्र पालवे, उद्धव सानप, मारुती केदार, भाऊसाहेब रणबावरे, वसंत पालवे, सुमित पालवे आदी ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget