Breaking News

अखंड हरिनाम सप्ताहाला पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी; ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनशिर्डी (प्रतिनिधी)- रुई येथे सालाबाद प्रमाणे श्री. सदगुरु गंगागिरीजी महाराज यांनी 125 वर्षापूर्वी सूरु केलेल्या हरिनाम सप्ताह पंचमीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सप्ताहानिमित्त विदर्भरत्न रामरावजी महाराज ढोक यांची तुलसी रामायण कथेची सुरुवात विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे यांनी दीप प्रज्वलन करून केली. 
सदर सप्ताह काळात नामांकित कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली. सप्ताह काळात ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण, पहाटे काकडा, प्रहरा तसेच हरिपाठ हे नित्य कार्यक्रम सुरू असून गावातील मंदिर व परिसर विद्युत रोशनाईने सुशोभित करण्यात आला आहे. 
रामरावजी महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रोत्यांना अतिशय मंत्रमुग्ध करण्यात येत असून सप्ताह काळात विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी कथेचा आनंद घेत असून भेट देनार्‍यामध्ये शिवशाहीर विजय तनपूरे , राजेश्‍वरी महाराज ,जगताप महाराज, साठे महाराज आदि मान्यवरांनी भेट दिली. रामकथेची सांगता बुधवार दि. 22 ऑगस्ट रोजी होत असून त्या निमित्त गावात गुढी उभारून. गावस अयोध्येचे स्वरूप निर्माण झाले असून गावातून शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. दि.23 ऑगस्ट रोजी सकाळी पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे. व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. सप्ताह यशस्वी होण्यासाठी समस्त गावकरी मंडळ त्यांचे सर्व सदस्य व अध्यक्ष नामदेव काका वाबळे तसेच पोपट वाणी, वाबळे सर , संजय ज. वाबळे , सुरेश भडांगे, गीतराम वाबळे, रावसाहेब देशमुख , सरपंच संदीप वाबळे , उपसरपंच सिताराम कडू , आसिफभाई ईनामदार व गावातील सर्व भाविक परिश्रम घेत आहे.