व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन अजय जयराम उपविजेता;भारताला रौप्य




नवी दिली वृत्तसंस्था/12
 भारताचा स्टार बॅडमिंटनपटू अजय जयरामने व्हिएतनाम ओपन बॅडमिंटनमध्ये उपविजेतेपदक पटकावले. या स्पर्धेमधून लक्ष्यसेनने काही कारणास्तव माघार घेतली होती. त्यामुळे स्पर्धेची मदार सर्वस्वी अजय जयरामवर अवलंबून होती.  सुवर्णपदकाची अपेक्षा याकडून होती. परंतु अजय जयरामला मोसमातील पहिल्या जेतेपदाने हुलकावणी दिली. व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन याने 28 मिनिटांत जयरामला 21-14, 21-10 असा पराभव केला.
या मोसमातलं अजयचं हे सलग दुसरं उप-विजेतेपद ठरलं आहे. याआधी White Nights International Challenge स्पर्धेच्या अंतिम फेरीतही अजयला हार पत्करावी लागली होती. मागच्या वर्षात झालेल्या दुखापतीवर मात करुन अजयने यंदाच्या वर्षी चांगलं पुनरागमन केलं आहे. व्हिएतनाम ओपन स्पर्धेत अजयने जपानच्या सातव्या मानांकित यु लागाराशीचा पराभव केला होता.
शनिवारी जपानच्या यू इमाराशी याला नमवून त्याने अंतिम फेरी गाठली होती, तर शेसारने भारताचा मिथून मंजूनाथ याच्यावर दुसऱ्या उपांत्य सामन्यात २१-१७, १९-२१, २१-१४अशी तीन गेममध्ये मात केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget