Breaking News

अडीच तोळे सोन्याची पोत लंपास


कोपरगाव शहर प्रतिनिधी

शहरातील इंद्रप्रस्थ रस्त्यावर चंद्रकला दगडे या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन हिसकावून नेली. या घटनेनंतर चंद्रकला दगडे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

बुधवारी दुपारी २ च्या सुमारास इंद्रप्रस्थ रस्त्यावर चंद्रकला दगडे गळ्यातील पोत काळ्या रंगाच्या दुचाकीवरून मागून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची ६५ हजारांची सोन्याची पोत चोरुन नेली. याप्रकरणी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोसई भरत नागरे पुढील तपास करीत आहेत.