Breaking News

विवाहस्थळांच्या वेबसाईटमधील गैरप्रकार रोखण्यासाठी उद्या परिषद


मुंबई : वित्तीय व सामाजिक क्षेत्रातील विशेषत: विवाहस्थळांसंदर्भातील ऑनलाईन गैरप्रकार रोखण्याच्या उद्देशाने उद्या दि. 24 ऑगस्ट रोजी मुंबईत एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्रालयाशेजारील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच या वेळात होणाऱ्या या परिषदेला विवाहस्थळ सुचविणाऱ्या संस्था, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, पोलीस, कायदेतज्ज्ञ यांनी सहभागी होणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्र सायबर, महिला अत्याचार प्रतिबंध कार्यालय आणि बॉम्बे चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, सायबरचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत, सायबरतज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी, सायबर कायदेतज्ज्ञ डॉ. कर्णिक सेठ, आयआयटीचे विभागप्रमुख डॉ. परमेश्वर बिराजदार, सागर सांगोडकर, कायदेतज्ज्ञ ॲड. मौलिक नानावटी, एचडीएफसीचे समीर रातोळीकर, लॅब सिस्टीम प्रा. लिमिटेडचे विनय विश्वनाथ हे मार्गदर्शन करणार आहेत.