Breaking News

राष्ट्र विकास कार्यात माझे योगदान विषयावर नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

क भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने 18 ते 29 वयोगटातील युवक युवतींसाठी राष्ट्राच्या विकासाकरीता माझे योगदान या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी दि.2 ऑक्टोबरला अहमदनगर येथे होणार असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींना नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांनी केले आहे.

स्पर्धकांना हिंदी अथवा इंग्रजी भाषेत आपले विचार मांडता येणार आहे. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 5 हजार रु., द्वितीय 3 हजार रु., तृतीय क्रमांकास 1 हजार रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहेत. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम विजेत्यास राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्यस्तरावर अनुक्रमे 25 हजार रु., 10 हजार रु., 5 हजार रु. तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे 2 लाख, 1 लाख व 50 हजार रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, दि.29 सप्टेंबर पर्यंन्त आधारकार्डसह प्रवेश अर्ज टिळक रोड येथील नेहरु युवा केंद्राच्या कार्यालयात जमा करावयाचे आहे. स्पर्धेत सहभागी होणारे तालुक्यातील स्पर्धकांना शाळा, महाविद्यालय, युवा व महिला मंडळ, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रवेश अर्ज कार्यालयास पाठवू शकतात. स्पर्धेत सहभागी होणार्‍या स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार असून, प्रवास भाडे मिळणार नसल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र कार्यालयास दुरध्वनी क्र. (0241) 2470287 व मोबाईल नं. 9422229974 यावर संपर्क करावा.