Breaking News

संततधार पावसामुळे घर कोसळुन आजी व नातू जखमी


पाथर्डी (प्रतिनिधी)- तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून संततधार पाऊस चालू असुन त्याचा फटका कोरडगाव येथील काकडे कुटुंबीयांना बसला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की चार दिवसांपासून कोरडगाव येथे चालू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी कोरडगाव येथे दशरथ भानुदास काकडे यांचे खांडाचे जूने घर पडले असुन या दुर्घटनेत दशरथ काकडे यांच्या पत्नी चंद्रकला व त्याचा नातू अजिंक्य असे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.
सलग चार दिवस संतधार पाऊस चालू असल्याने काकडे यांच्या जून्या माळवदाच्या घरावर पाणी साचल्याने बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास काकडे याच्या पत्नी व नातू चंद्रकला खणांच्या घरात चहा पित असताना अचानक घराचा वरचा भाग कोसळून त्याखाली आजी व नातू दबले गेले. त्यानंतर शेजार्‍यांनी तात्काळ मदतीची शर्थ करत अर्धा तासानंतर दोघांनाही ढिगार्‍याखालुन बेशुध्दावस्थेत बाहेर काढत पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.