Breaking News

टोका प्रवरासंगम येथे अण्णाभाऊ साठेंना अभिवादन


नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम- टोका येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 98 व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच भारत गवळी यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी बबन खंडागळे, दत्तात्रय मते, सोमनाथ साठे, बंटी खंडागळे, राजू खंडागळे, सोपान खंडागळे, नंदू चाबुकस्वार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष शांतवन खंडागळे यांनी आण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य विशद करून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
प्रवरासंगम येथे सरपंच सुनील बाकलीवाल यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. अण्णाभाऊ साठेंचे कार्य बहुजन समाजाच्या व दिन दलित समाजाच्या उत्कर्षासाठी होते त्यांच्या कार्यातून युवकांनी स्फूर्ती घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले .जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी विष्णू काळे, मुळाचे संचालक बाळासाहेब पाटील, गणेश थोरात, सोमनाथ साठे, नितीन 
भालेराव, नंदू सोनवणे, समाधान चाबुकस्वार, नितीन गायकवाड, पाठे सर, भारत गवळी, रवी सोनवणे, शंकर खंडागळे, संतोष पांडव, शिक्षिका सुनीता कर्जुले, श्रीमती जोशी, मुख्याध्यापक कोल्हे, शिक्षिका श्रीमती झरेकर, श्रीमती बारकोर, राजेंद्र चापे, अमोल गांगरडे, गाडेकर आदीसह पालक मोठया संख्येने उपस्थित होते. शांतवन खंडागळे यांनी आभार मानले.