Breaking News

पाथर्डी शहरात गणेशोत्सव एकत्रितपणे साजरा करणार


पाथर्डी (प्रतिनिधी)- आगामी गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात नुकतीच शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. यावेळी पाथर्डी गणेश फेस्टीवल-2018 या बॅनरखाली एकत्रित गणेशोत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. अष्टवाडा तरुण मंडळांचे अध्यक्ष संतोष गटाणी यांच्या पुढाकारातुन आगामी गणेशोत्सव एकत्रित साजरा करण्या संदर्भात पालिका सभागृहात नुकतीच विविध मंडळांच्या पदाधिकारी व सभासदांची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डाॅ.मृत्युंजय गर्जे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक नामदेव लबडे, प्रविण राजगुरु, बादल पलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष सोनुशेठ गुगळे, मा.नगरसेवक सोमनाथ टेके, शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब धस, सोमनाथ रोडी, राजेंद्र कोटकर, सोमनाथ बंग, अभय गांधी, किरण आटणिवाले, विठ्ठल मंत्री, पुरुषोत्तम हारकुट, गणेश बाहेती, नितीन गटाणी, पुरुषोत्तम ईजारे, सतिष बडदे, संतोष वराडे, बाळासाहेब ढुमने, वैभव मानुरकर,अनिल मंत्री, ब्रम्हदेव रावतळे, संदिप काकडे, अक्षय काळे आदींनी आपल्या मंडळाची भुमिका मांडली.यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सर्वच मंडळांनी एकत्रित पणे गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले.या काळात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विनोदी, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमासह महिला, युवक,युवतींच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन शहरातील मध्यभागी असलेल्या मा.आ.माधवराव नि-हाळी नाट्यगृहात करण्याचे ठरले. आभार नितीन गटाणी यांनी मानले