Breaking News

श्री साई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रीफेक्टसचा गौरव


नगर - पाईपाईन रोडवरील गावडे मळा येथे महर्षी प्रतिष्ठान संचलित श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून विद्यालयात निवड झालेल्या हेडबॉय, हेडगर्ल, सिनियर व ज्युनिअर प्रीफेक्टस अशा 18 विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.गोपाल बहुरुपी पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक मा. अशोकजी कानडे सर, मा. लहुजी कानडे, सौ.कविता कानडे हे व भारतीय आर्मीचे सोल्जर एल.डी.फुलाराम पवार आदी उपस्थित होते.
त्यानंतर विद्यालयाची प्रीफेक्टोरिअल सिस्टिम, शाळेची शिस्त, प्रीफेक्टसला देण्यात येणारे अधिकारी व त्यांची कर्तव्य याविषयी यथोचित माहिती विद्यालयाचे एज्युकेशन डायरेक्टर मा.नंदकिशोर भावसार यांनी आपल्या प्रास्तविकेतून दिली. हेडबॉय विश्‍वकर्मा आदित्य, हेडगर्ल पांचाल खुशी, तसेच सिनिअर प्रीफेक्ट गडाख ऋतुता,इंगोले विद्या, राहिंज राधिका, कर्डीले आचल, एडके ऐश्‍वर्या, मरकड प्रतिक्षा, निलख आयुष, पांचाल विवेक, शेकडे साहिल, चांडक प्रथमेश, कदम तेजस, पेवाल प्रथमेश, ज्युनिअर प्रीफेक्टस पिसे अनुष्का, निलख आसावरी, यादव आकाश, मिश्रा ओमकार या सर्व प्रीफेक्टसना पाहुण्यांच्या हस्ते प्लेट्स प्रदान करुन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.शिल्पा खेडकर यांनी केले. तर आभार पुनम सैंदनशीव यांनी मानले.