Breaking News

जामखेड तालुक्यात आज आंदोलन चक्काजाम, शहरात राहणार कडकडीत बंद


जामखेड /श. प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन संपूर्ण महाराष्ट्र मोर्चांनी व आंदोलनाने पेटुन उठला असतानाही सरकार फक्त अश्‍वासने देवून मराठा समाजाला झुलवत ठेवत आहे. या अनुषंगाने आज संपूर्ण महाराष्ट्रासह जामखेड तालुक्यातील रस्ते अडवुन चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत सकल मराठा समाज जामखेडच्या वतीने नुकतीच बैठक आयोजित करून आंदोलनासंबंधित तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारने फक्त आश्‍वासने दिली मात्र अद्यापही आरक्षण दिले नाही. यासाठी तालुक्यातील जवळा, अरणगाव, खर्डा व जामखेड या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे आयोजन जामखेडच्या सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आले असून, तालुक्यातील प्रत्येक गावात आंदोलनात सहभागी होण्यासाठी बैठकांचे आयोजन सुरु करण्यात आले आहे. नुकतीच शहरातील राज लॉन्स या ठिकाणी शहरातील आंदोलनासंबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये परीसरातील गावांनी देखील आज चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हे ठिय्या आंदोलन असल्याने खर्डा चौकात दिवसभर सकल मराठा समाज बसुन आंदोलन करणार आहेत.
यानंतर सायंकाळी 5 वाजता हे आंदोलन मागे घेण्यात येणार आहे. तसेच त्या दिवशी तालुक्यातील संपूर्ण शाळा व जामखेड तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हे आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याची माहिती देखील सकल मराठा समाज्याच्या आंदोलनकर्त्यांनी दिली.
यावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, शरद कार्ले, सोमनाथ तनपुरे, युवराज पोकळे, तात्याराम पोकळे, राम निकम, नगरसेवक डीगंबर चव्हाण, पवन राळेभात, संजय काशिद, सुनिल जगताप, प्रदीप टापरे, कुंडल राळेभात, संजय वराट, महादेव डुचे, पांडुराजे भोसले, नितीन राळेभात, सोमनाथ पोकळे, दिपक महाराज गायकवाडसह सकल मराठाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.