Breaking News

९ ऑगस्ट ला राहुरी तालुका कडकडीत बंदराहुरी प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदचे अवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. गुरुवारी राहुरीचा आठवडे बाजार भरणार नाही, अशी माहिती राहुरीच्या सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सर्वत्र मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. सरकार मात्र या मोर्चांकडे सकारात्मक न पाहता आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी आणि या सरकारला धडा शिकविण्यासाठी ९ ऑगस्ट या जागतिक क्रांतीदिनी सकल मराठा सामाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद आंदोलनात राहुरी तालुक्यातील सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. रविवारी राहुरी येथे झालेल्या सकल मराठा

या आंदोलनादरम्यान कोणत्याही समाजकंटकाकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे. कोणतीही दुर्घटना घडणार नाही, याची सर्व समाज बांधवांनी काळजी घ्यावी. तसेच कुठेही अनुचित प्रकार घडत असेल तर प्रतिबंध करावा. प्रतिबंध करूनदेखील न ऐकल्यास पोलिसांना अथवा मराठा समन्वयकांना कळवावे असे आवाहन यासंदर्भात करण्यात आले आहे.