Breaking News

स्व. वाजपेयींना सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली


कोपरगाव शहर प्रतिनिधी 

भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. यासाठी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब कासार होते. यावेळी उपसरपंच विवेक परजणे, संजीवनी कारखान्याचे संचालक फकिरराव बोरनारे, माजी संचालक शिवाजीराव बारहाते, त्र्यंबक परजणे, पांडुरंग शिंदे, लक्ष्मण साबळे, विधीज्ञ शिरीश लोहकणे आदींनी श्रध्दांजली अर्पण केली. या सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणात वाजपेयी हे सर्वसमावेशक नेते असल्याचे सांगून ते माणसांतील देवमाणूस होते, असे सांगितले. नद्या जोड प्रकल्प, पंतप्रधान ग्राम सडक योजना, पोखरण अणुस्फोट हे त्यांची उल्लेखननीय कामगिरी होती, असेही अनेकांनी सांगितले. याप्रसंगी अशोक लोहकणे, शिवाजी सोनवणे, शिवाजी वरगुडे, संभाजी आगवण, दिनेश दिंडे, सुभाष बिडवे, अर्जुन तांबे, मोहन ढेपले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.