Breaking News

केशरबाग कृषी पर्यटन केंद्रात रक्षाबंधन महोत्सवाचे आयोजन
 नगर । प्रतिनिधी - राखीपौर्णिमेच्या सणाचा आनंद निसर्गरम्य वातावरणात एकमेकांची ख्यालीखुशाली विचारत लुटता यावा, यासाठी नगर-दौंड रस्त्यावरील खंडाळा येथील केशरबाग मेहेर कृषी पर्यटन केंद्रात खास केशरबाग रक्षाबंधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक अनिल मेहेर यांनी दिली. जाणीवपूर्वक फुलवण्यात आलेली हिरवळ, रम्य पावसाळी वातावरणात चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. लाडक्या भाउरायाला मायेचे बंधन असलेले राखी बांधून भगिनीवर्ग सणाचा आनंद घेतात. एक प्रकारे कौटुंबिक स्नेहमिलनच याठिकाणी होते. केशरबागमधील बहरलेल्या वातावरणात रूचकर व स्वादिष्ट भोजनाचीही उत्तमव्यवस्था याठिकाणी आहे. चुलीवरची गरमागरम भाकरी, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या भाज्या, मिरचीचा ठेसा असा चमचमीत गावरान मेन्यू तसेच बासुंदी, गुलाबजामअसा स्वीट मेन्यू रसनातृप्तीचा पुरेपुर आनंद देतो. याशिवाय लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्या बसविण्यात आलेल्या आहेत. केशरबाग मेहेर कृषी पर्यटन केंद्र निसर्गात रमण्याचे हक्काचे ठिकाण बनले आहे. रक्षाबंधन महोत्सव 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यानंतर 1 सप्टेंबरपासून याठिकाणी दर रविवारी दुपारी 4 ते 7 यावेळेत खास महाराष्ट्रीय जेवनाची प्रतिव्यक्ती नाममात्र 100 रुपयात व्यवस्था केली जाणार आहे. आपल्या कुटुंबियांसह, मित्र परिवारासमवेत प्रसन्नचित्त वातावरणात सर्वांना अस्सल चवीच्या महाराष्ट्रीयन भोजनाचा आनंद घेता येणार आहे. याठिकाणी ते योगप्राणायाम, निसर्ग व नैसर्गिक भोजन या आरोग्यवर्धक त्रिसुत्रीबाबत मार्गदर्शन करतील. केशरबाग येथे पूर्णत: नैसर्गिक वातावरणात हायजेनिक शुध्द शाकाहारी भोजनाचा आस्वाद मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नोंदणीसाठी मो. 9028177732 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.