Breaking News

भारतरत्न स्व. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञानक्रांतीचे जनक : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी

२१ व्या शतकासाठी विकासाचा आणि आधुनिकतेचा मंत्र असणार्‍या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील भारतियांची कामगिरी आज जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरली आहे. भारताच्या एकात्मतेसाठी व अखंडतेसाठी बलिदान देणारे भारतरत्न स्व. राजीव गांधी हे या विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक आहेत, असे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले.

आ. थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयात संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, शहराध्यक्ष विश्‍वासराव मुर्तडक, नवनाथ अरगडे, अर्चना बालोडे, निखील पापडेजा, चंद्रकांत कडलग, केशवराव मुर्तंडक, प्रमिला अभंग, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब पवार, सुभाष सांगळे, गुलाबराव ढोले, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे, उबेद शेख, बाळासाहेब गायकवाड, अनिस शेख, ज्ञानेश्‍वर राक्षे आदी उपस्थित होते.