Breaking News

साईसेवा उद्योग समुहातर्फे ५१ पोत्यांच्या भाकरी


शिर्डी प्रतिनिधी

श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त योगीराज सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७१ व्या अखंड हरीनाम सप्ताहात निघोज येथील साईसेवा उद्योग समुहाच्यावतीने ५१ पोत्यांच्या भाकरी पुरविण्यात आल्या.

कै. काशिनाथ मते आणि कै. बाजीराव मते यांच्या स्मरणार्थ हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमासाठी दोनशे महिला दिवसरात्र राबत आहेत. साईसेवा उद्योग समुहाचे संचालक संपत मते आणि बाजार समितीचे संचालक शरद मते यांच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.