Breaking News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल : संग्राम कोते


राहुरी तालुका प्रतिनिधी 

2019 मध्ये राहुरी नगर पाथर्डी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तनपुरे कुटुंबियाच्या पाठीशी पक्षाचे सर्व ताकद उभी करण्याचे पक्ष श्रेष्टींचे आदेश आहे.त्यासाठी वर्षभर जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी बूथ समित्या सक्षम करणे गरजेचे असून त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते ह्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राहुरी नगर पाथर्डी विधान सभा मतदार संघातील राहुरी तालुक्यात वन बूथ पंधरा युथ ह्या पक्षाचे आदेशानुसार स्थापन केलेल्या बूथ समिती सदस्यांचा संकल्प मेळाव्यात श्री कोते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे होते.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाड़े पक्षाचे कार्याध्यक्ष संजय कोळगे सरचिटणीस स्वप्निल घुले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे पंचायत समितीचे उपसभापति बाळासाहेब लटके प्रभाकर गाड़े तालुकाध्यक्ष मछिंद्र सोनवणे भास्कर गाड़े सरचिटणीस विजय कातोरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ आदि उपस्थित होते.

श्री कोते ह्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले नंतर पहिल्याच बैठकीत राज्यातील प्रत्येक विधान सभा मतदार संघात बूथ कमिट्या स्थापन करण्याच्या सूचना सर्व युवकाना दिल्या.त्याप्रमाणे राज्यातील 150 मतदार संघात जाऊन बूथ कमिटी स्थापन करण्याच्या सूचना देऊन त्याप्रमाणे राज्यात सर्वत्र बूथ कमीटी स्थापन करण्यात आल्या आहेत.बूथ कमिट्या ह्या फक्त निवडणुकी पुरत्या नसव्यात प्रत्येक बूथ कमिटी सदस्य हा सक्षम असावा पक्षाच्या विचाराशि बांधील असावा.ह्या नंतर पक्षाच्या गावोगाव शाखा युवक संघटना विद्यार्थी संघटना तयार करून त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यक्रत्यानी काम केले पाहिजे.

राज्यातील केंद्रातील भाजप सरकारने 2014 च्या निवडणुकीत सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क करून भरपूर आश्वासने दिली त्यातील किती आश्वासने आता पर्यन्त पूर्ण केली केवल मतदारांची फसवणूक केली असल्याचे दाखवून दिल पाहिजे.जनतेच्या प्रश्नावर गावोगाव तालुक्यात संघर्ष उभा करा.गर्दी ऐवजी दर्दी शोधा. यापुढे पक्षाच्या नेत्यावर होणारे आरोप पक्षाविषयी होणारे आरोप प्रत्यारोप ह्याला सर्वानी प्रत्युत्तर दिले पाहिजे. तालुक्यात प्राजक्त दादा तुम्ही वर्षभर मतदार संघ पिंजून काढ़ा तुम्हाला पक्षाची सर्व तोपरि मदत दिली जाईल बूथ कमिट्यांच्या सदस्याना प्रशिक्षण शिबिर ठेवा त्यासाठी व्यक्ते देतो.येत्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदार संघात 100 टक्के परिवर्तन घडवून आणायचे असून त्यासाठी पक्ष श्रेष्टिने तनपुरे कुटुंबाच्या पाठीशी सर्व ताकद उभी करणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद् सदस्य शिवाजी गाड़े ह्यांनी पक्षाची बूथ कमिटी स्थापन करण्याची संकल्पना निश्चित चांगली आहे.ह्यातून कार्यकर्ते घडविण्याची फार मोठी संधी मिळणार आहे.पूर्वीची निवडणुकीची पद्धत व आजच्या पद्धतित खुप फरक असून आज सर्व डिजिटल यंत्रणा कार्यरत आहे.2 वेळा विधानसभा निवडणूक अतिशय खडतर परिस्थित लढलो पैसा नाही तरी कार्यकर्त्यांचे जीवावर निवडणूक लढल्याचे सांगत यापुढे तालुक्याचा आमदार होण्यासाठी सर्व टिमचा वापर करूँ विधानसभा लोकसभा निवडणुकीत तालुक्यातून बहुमत मिळवून दिले जाईल असे श्री गाड़े ह्यांनी सांगून प्राजक्त दादा व माझ्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले.

नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे ह्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने सर्व मतदार संघात बूथ कमिट्या स्थापन करून ह्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम केले आहे.तसेच अनेक युवक ह्या माध्यमातून राजकीय प्रवाहात सामिल झाले असून ज्याना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांचे दृष्टीने निश्चित चांगले आहे.2014 च्या निवडणुकीत भाजपने सोशल मिडियाचे माध्यमातून जो प्रचार केला त्या तुलनेत पक्ष कमी पडला. राज्यात आघाडी सरकारने अनेक प्रश्न मंजूर केले होते सर्व सामान्य जनतेला आधार देण्याचे काम आघाडी सरकारने केले पण प्रसिद्धि कमी पडले.

तालुक्यात गेल्या 10 /15 वर्षापासून भाजपचा लोकप्रतिनिधि निवडून येतो ह्यांनी मागील 25 वर्षाचा कामाचा हिशोब मागण्या पेक्षा 10 वर्षात तालुकासाठी काय केले ते सांगावे.ह्या 10 वर्षात कुठे पुल बांधला कुठे नवीन रस्ता तयार केला कुठे नवीन पाणी योजना सुरु केली वांबोरी भागड़ा चारी साठी काय केले हे दाखवाव.मी विधानसभेच्या उमेदवारीची कुठेही वाच्यता केली नाही पक्षाचे आदेशाचे बाहेर मी जाणार नसताना हे स्पष्ट करून पक्षाचे काम करणार आहे.2014 च्या निवडणुकीत आमदारानी अनेक आश्वासने दिली होती निळवडे धरणाचे पाणी आणु तालुक्यातील पाणी बाहेर जाऊ देणार नाही म्हणाणारे कुठेत्.जिल्ह्यात शांत प्रिय असलेल्या राहुरी तालुक्याची कायदा सुव्यवस्था बिघडली ह्यास कोण जबाबदार आज नदी काठाचा नागरिक शहरातील नागरिक सुरक्षित नाही गुंडगिरी वाढली आहे. आज शहरात पोते भरूँ कट्टे सापड़तील अशी परिस्थिति आहे. ही परिस्थिति सुधारण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधि आमदार असणे गरजेचे असून आमदारकी मलाच पाहिजे असे नाही पक्ष श्रेष्ठी घेतली तो निर्णय मान्य आहे.माझ्यात व शिवाजी गाड़े ह्यांच्या कोणतेही मतभेद नाहीत मतभेद विसरून आम्ही पुन्हा एकत्र आलो जिल्हा परिषद नगरपालिका ग्रामपंचायत निवडणुका एकत्र लढलो चांगले निकाल आले.आम्ही शिवसेनेत गेलो विचार पटले नाही राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाच बाहेर पडलो सत्ता गेल्यावर नाही.शेवटी आपल्या विचारांची माणसे जिथे आहे त्या विचाराशी पुन्हा एकत्र आलो.असे श्री तनपुरे ह्यांनी सांगितले.

यावेळी माजी उपसभापति रविन्द्र आढाव अप्पासाहेब जाधव मुळा प्रवरा संचालक शिवाजी सागर गणेश घोरपडे मछिंद्र सोनवणे अतुल तनपुरे सरपंच चंद्रकांत पानसंबळ ह्यांची भाषणे झाली.

या मेळाव्यास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी युवक नगरपालिकेचे नगरसेवक बाजार समितीचे संचालक सरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन पेरणे सर तर आभार पंचायत समिती सदस्य प्रदीप पवार ह्यांनी मानले.