Breaking News

पाथर्डीत सावता महाराजांना अभिवादन


पाथर्डी (प्रतिनिधी) - सालाबादप्रमाणे शहरातील कोरडगाव चौकात संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्व समाजबांधवांच्या वतीने पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, पांडुरंग सोनटक्के, भाऊ तुपे, अरविंद सोनटक्के, नगरसेवक महेश बोरुडे, किशोर परदेशी, अ‍ॅड प्रतिक खेडकर, दत्ता सोनटक्के, अजिनाथ डोमकावळे, अतुल पानखडे, शशी साखरे, शैलेश कोरडे, वैभव पुंड, लक्ष्मण सोनटक्के
,बबन सबलस आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत संत सावता महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच संत सावता महाराज याच्यावर आधारित अभंग, भक्ती गीतांनी धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली होती. यावेळी संजय साखरे, अक्षय काळे ,संतोष सोनटक्के ,माणिक साखरे,तुकाराम पानखडे,नाना शिंदे ,निलेश केरकळ, दिलीप पानखडे , नाना नागरे ,सोनू डोमकावळे,संजय केरकळ,श्रीधर सोनटक्के आदी उपस्थित होते.