रयत शिक्षण संस्थेच्यावतीने शिक्षकांसाठी प्राचार्या सौ.गीता गिल्डा यांचे मार्गदर्शन.


नगर - इंग्रजी विषयी गोडी निर्माण करून ,साध्या सोप्या पद्धतीने चलचित्र स्वरूपात इंग्रजी भाषेचे ज्ञान व प्रशिक्षण विदयार्थ्यांना दिले तर त्याचे उत्तम परिणाम मिळतात.तसेच ज्या पालकांना इंग्रजी विषयी जास्त ज्ञान नाही त्यांना कशा प्रकारे ज्ञान देता येईल याचा विचार करून पालक ,शिक्षक व विदयार्थी यांच्यात सुसंवाद निर्माण करणारे नवे धोरण स्वीकारावे आसे आवाहन प्राचार्या सौ.गीता गिल्डा यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्यावतीने पूर्व प्राथमिक व प्रार्थमिक शिक्षकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरतर्फे ‘हसत खेळत इंग्रजी शिक्षण’ या विषयावर क्लबच्या अध्यक्षा व रामकृष्ण फौंडेशनच्या शाळा व कॉलेजच्या प्राचार्या सौ.गीता गिल्डा यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी अध्यक्षा सौ. मधुबाला चोरडिया,मीनाताई जगधने,लंके सरउपस्थित होते.

सेमी व इंग्रजी माध्यमातील विदयार्थी,पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय व समस्या या विषयी बोलताना सौ. गिल्डा म्हणाल्या कि, छोट्या छोट्या साधनांचा वापर करून हसत खेळत इंग्रजी भाषा शिकविता येते,मुलांचा कल पाहून त्यांना चित्र व चलचित्रांच्या माध्यमांचा वापर करून कमी वेळात इंग्रजी विषयी गोडी वाढविता येईल ,त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान,अर्थात डिजिटल वर्गांचा वापर करण्याची गरज व्यक्त केली. या कार्यशाळेस श्रीरामपूर,राहता,राहुरी,श्रीगोंदा,जामखेड मधील शिक्षक सहभागी झाले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget