विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तुंचे वाटप


सुपा / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील रायतळे गावातील वस्तीशाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरवनाथ वस्तीशाळेत विद्यार्थ्यांना संवेदना केअर फाऊंडेशन अहमदनगर यांच्या सौजन्याने दप्तर, वही, कंपासपेटी आदी प्रकारचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात आले.
डोंगराच्या कुशीत बसलेली एका पांदीतून रस्ता असलेली गुणवत्तेत नावाजलेली अशी शाळा भैरवनाथ वस्ती (रायतळे) या शाळेला जावे लागते, दुर्गम ठिकाणी मुलांच्या शैक्षणिक गरजा लक्षात कोण घेतो. परंतु अहमदनगर येथील संवेदना केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल कासट, मंगेश बगाडे यांना विद्यार्थ्यांच्या खर्‍या संवेदनाची जाणीव झाली. सकाळी 7 वाजता शाळेत अचानक भेट देवून मुलांना आश्‍चर्याचा धक्का दिला. सभोवार संपूर्ण हिरवळ, डोलणारी शेतातील पिके व ग्रामिण भागातून वाडया, वस्तीमधुन येणार्‍या या मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविले. या संवेदनाक्षम युवक मित्रांचा एक ग्रृप तयार करून गरिबांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच शालेय उपयोगी वस्तू दप्तर, वही, कंपास पेटी आदी साहित्याचे वाटप करतात. स्कूल चले हम, टॅलेंट सर्च, करिअर गाईड अशा प्रकारचे उपक्रम हे संवेदनशील मित्र परिवार घेत असतात. तसेच तरूण युवकांना तांत्रिक शिक्षण देण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमास सुपा-रांजणगाव केंद्राचे व केंद्रातील प्रत्येक शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविणार्‍या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन मार्गदर्शन करणारे केंद्रप्रमुख बाळासाहेब साबळे, सरपंच भाऊसाहेब येणारे व शाळेतील पालक लक्ष्मण येणारे, शिवदास चितळकर, बबन चितळकर, पाराजी चितळकर, कृष्णा येणारे, सचिन कांडेकर, दीपक चितळकर, चंद्रकांत येणारे, विजय येणारे, दत्ता रोकडे, भाऊसाहेब येणारे, सुनिल येणारे आदी यावेळी उपस्थित होते.
शाळेतील मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी यांनी प्रास्ताविक केले. तर शिक्षिका शंकुतला औटी यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget