‘पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून ‘माया-ममता’


बंगळुरू : 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अथवा बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती असल्या तरी आमची काही हरकत नाही, असे मत माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष एच.डी.देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे. देवेगौडा म्हणाले, काँग्रेसकडून राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसकडून महिला उमेदवार म्हणून पंतप्रधानपदासाठी ममता बॅनर्जी किंवा मायावती यांना उमेदवारी घोषित करणार आहे, त्याबाबत मला कोणतीही अडचण नसल्याचे देवेगौडा यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर देताना स्वाभाविकपणे राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असे सांगितले होते. आम्ही आमच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखालीच ही निवडणूक लढवणार आहोत, असे त्यांनी म्हटले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget