Breaking News

अभिनेत्री रविना टंडन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 'उद्यान राजदूत'मुंबई  : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची “उद्यान राजदूत अर्थात पार्क ॲम्बॅसिडर” म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन यांनी मान्यता दिली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रस्ताव श्रीमती टंडन यांना दिला होता. त्याचा स्वीकार करत स्वीकृतीचे पत्र त्यांनी वनमंत्र्यांना पाठवले आहे.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दि. १ ऑगस्ट २०१८ रोजीच्या पत्रान्वये मुंबई शहराचं फुफ्फुस म्हणून ज्या उद्यानाकडे पाहिले जाते त्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची उद्यान राजदूत होण्याची विनंती श्रीमती टंडन यांना केली होती. पत्रात त्यांनी १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण झाल्याचे सांगून संकल्पकाळात राज्यात लोकसहभागातून १५ कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड झाल्याचे नमूद केले होते.