Breaking News

केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन


कोपरगाव श. प्रतिनिधी : 

केरळ राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कोपरगाव शहरातील साईभक्त मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. पुरग्रस्तनसाठी कोणत्याही प्रकारे रोख स्वरूपात मदत न गोळा वस्तूंच्या रूपाणे सढळ हाताने व उदार अंतकरणाने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

यासाठी दैनंदिन वापरासाठी उपयोगी येतील अशा ब्लँकेट नवीन अथवा चांगल्या अवस्थेतील कपडे, नवीन, एमर्जन्सि लाईट, ओडोमास, साबणी, पेस्ट, ब्रश, गृहोपयोगी भांडी, बेडशीट, सतरंज्या ताडपत्री आदी वस्तू कोपरगाव शहरात व्यापारी धर्मशाळा येथे द्याव्यात. दरम्यान, येत्या रविवारी संपूर्ण दिवस गावात फेरी काढली जाणार आहे.