Breaking News

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती चिंताजनक

कोलकाता : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती ढासळली आहे. चॅटर्जी हे 89 वर्षांचे आहेत. श्‍वसनाचा आणि मुत्रपिंड विकाराचा त्रास होत असल्यामुळे त्यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चॅटर्जी यांचे शरीर उपचारांना साथ देत नसल्यामुळे त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. मागील दोन महीन्यांनमध्ये दोम वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमनाथ चॅटर्जी हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्कसवादी) चे ज्येष्ठ नेते आहेत. ते संसदेचे सर्वात जास्त काळ सदस्य असणाऱया नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी दहा वेळा लोकसभेचे सदस्यपद भुषविले आहे. 2004 ते 2009 च्या दरम्यान लोकसभा अध्यक्ष म्हणुन त्यांनी काम पाहीले होते. 1968 साली कम्युनिस्ट पार्टीत दाखल होऊन 2008 पर्यंत ते पार्टीचे नेते म्हणुन राहीले. भारत अमेरिका अणुकरार मुद्यावरून लोकसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा पक्षाचा आदेश धुडकाऊन लावल्यानंतर त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यात आले होते.