Breaking News

भेंडा येथे विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे ऑटोमोबाईल्सचे साहित्य जळून खाक


भेंडा प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी नजिक नेवासा शेवगाव राजमार्गावरील साबळे ऑटोमोबाईल्सला मध्यरात्री अचानक शॉर्टसर्कीटमुळे मोठी आग लागुन अंदाजे पन्नास लाख रूपयांचे आँईल व इतर साहित्य जळून खाक झाले .महामार्गालगत असलेल्या साबळे मोटारचे मालक महादेव साबळे यांनी सांगितले की मी रात्री बारा वाजता शोरूम चे गस्ती घालून गेलो
असताना पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी शोरूममध्ये शॉर्टसर्कीटमुळे मोठा आवाज होऊन जाळाचे अग्नी तांडवचे लोळ दिसून येते होते. वर्कशॉप मधील झोपलेले कारागीर घाबरून गेले व एका व्यक्तीने घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर मी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमक विभागला कल्पना दिली. तात्काळ संबधित कामगार व अग्निशमन बंबच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.
सदरची घटना समजतात भेंडा जिल्हा परिषद गटाचे सदस्य दत्तात्रय काळे, ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक मिसाळ , अंबादास गोंडे, सुखदेव फुलारी, नामदेव शिंदे, रमेश पाडळे, राहुल कोळसे , सौंदाळा गावचे माजी सरपंच शरद आरगडे, वीज वितरणचे कर्मचारी संदीप पाटोळे घटनास्थळी येऊन पाहणी केली व घटनेची माहिती कुकाणा पोलीस स्टेशन ला कळवली.