दुसऱ्या कसोटीसाठी संघात दोन फिरकीपटू ?


नवी दिल्ली प्रतिनिधी

लॉर्ड्स मैदानावर आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरवात होणार आहे. येथील खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी फायद्याची असली तरी सध्या वाढलेल्या गरमीमुळे खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक ठरू शकते. हे कारण लक्षात घेऊन भारतीय संघ या कसोटीत दोन फिरकीपटू खेळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर अश्विनने तर आपली जागा पक्की केली आहे. दुस-या जागेसाठी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यात चुरस रंगणार आहे असे दिसते.

इंग्लंडमध्ये काही दिवसांपासून तापमान 32 डिग्रीच्या वर आहे. 1976नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये असे तापमान झाले आहे आणि त्यामुळे खेळपट्टीवरील ओलावा कायम राखण्याचे आव्हान ग्राऊंड्समन यांना पेलावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लॉर्ड्स कसोटीत दोन फिरकीपटू खेळवण्याचा सल्ला अनेक दिग्गज खेळाडूंनी दिला आहे.

फिरकीपटू हे भारतीय संघाचे बलस्थान आहेत. एडबॅस्टन कसोटीत अनुकूल वातावरण असूनही भारताने एकच फिरकीपटू खेळवला होता. अनुभवी गोलंदाज हरभजन सिंगने त्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्याने लॉर्ड्स कसोटीत अश्विनच्या जोडीला कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget